लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीची परीक्षा खासगीरीत्या देण्यासाठी ‘फॉर्म नंबर १७’ भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार १३ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह आणि १ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, दाखला नसल्यास द्वितीय प्रत आणि प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो जवळ ठेवावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना ही कागदपत्रे अपलोड करायची आहेत. संपर्कासाठी विद्यार्थ्यांनी ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक नोंदवणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर, त्याची प्रत ई-मेल आयडीवर पाठवली जाणार आहे.

आणखी वाचा-मोसमी पावसाची उघडीप, पोषक स्थिती अभावी पाच दिवस पावसाची विश्रांती

विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्क भरल्याच्या पावतीच्या दोन प्रती, मूळ कागदपत्रे त्याच कालावधीत निवडलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायची आहेत. htpp://form17.mh-ssc.ac.in या दुव्याद्वारे दहावीच्या परीक्षेचा तर htpp://form17.mh-hsc.ac.in या दुव्याद्वारे बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From when can form no 17 be filled for 10th and 12th exams pune print news ccp 14 mrj