पिंपरी : घराच्या दारासमोर गांजाची झाडे लावल्याचा प्रकार पिंगळेनिळख येथे उघडकीस आला आहे. पोलिसांनी एकाला अटक अटक केली असून दारासमोरील मोकळ्या जागेतून एक लाख ९६ हजार ९३० रुपये किमतीची १२ किलो ४६२ ग्रॅम वजनाची दोन झाडे जप्त करण्यात आली आहेत. धानेश अनिरुद्ध शर्मा (वय ३४, रा.पिंपळेनिळख, मूळ कोहरलिया, गोपालगंज बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरोपी शर्मा हा फर्निचरचे काम करतो. पिंपळेनिलख येथील एका चाळीत तो वास्तव्यास आहे. त्याच्या राहत्या घरासमोर मोकळी जागा आहे. तेथे काही झाडेझुडपे आहेत. आरोपी शर्मा याने या झाडाझुडपांमध्ये दोन गांजाची झाडे लावली होती. याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.