पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक अल्पशी वाढली. हिरवी मिरची, ढोबळी मिरची, आले, फ्लाॅवरच्या दरात घट झाली. शेवग्याच्या दरात वाढ झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून २ टेम्पो पावटा, कर्नाटक आणि गुजरातमधून ४ ते ५ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून २ टेम्पो शेवगा, राजस्थानातून ७ ते ८ टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून १२ ते १३ ट्रक मटार, तामिळनाडूतून २ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेशातून ९ ते १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ५५० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो सात ते आठ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, भुईमूग शेंग ४० ते ५० गोणी, कांदा १०० ते १२५ ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४० ते ४५ टेम्पो बटाट्याची आवक झाली.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
Distribution of fake inheritance certificates by court clerk navi Mumbai news
न्यायालयातल्या लिपिकाकडून बनावट वारस दाखल्यांचे वाटप;  पनवेल येथील न्यायालयातील प्रकार, लिपिक अटकेत
onion prices loksatta news
कांदा स्वस्त; गृहिणींना दिलासा, आठवडाभरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी घट

हेही वाचा…राज्य सरकारच्या जंतनाशक मोहिमेतून पुण्याला वगळलं! नेमकं काय घडलं…

मेथी, कांदापात, मुळे, चुक्याच्या दरात घट

गेल्या आठवड्याच्या तुलनेत मेथी, कांदापात, करडई, मुळे, चुका या पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. कोथिंबिर, चाकवत, करडई, पुदिना, राजगिरा,अंबाडी, चवळई, पालक या पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर दीड लाख जुडी, तसेच मेथीच्या ८० हजार जुडींची आवक झाली. बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- १५०० ते २०००, मेथी – १००० ते २०००, शेपू – ५०० ते १२००, कांदापात- १२०० ते १५००, चाकवत – ५०० ते ८००, करडई- ४०० ते ८००, पुदिना – ८०० ते १०००, अंबाडी – ५०० ते ८००, मुळे – १००० ते १५००, राजगिरा- ५०० ते ८००, चुका – ५०० ते ८००, चवळई- ५००-८००, पालक- १०००-१५००. हरभरा गड्डी – १००० ते १५००

हेही वाचा…राहुल कलाटेंची ईव्हीएमबाबत शंका; २५ बूथवरील ईव्हीएमची होणार पडताळणी!

लिंबांचा दरात घट

मार्केट यार्डातील फळबाजारात लिंबांच्या दरात घट झाली. बोरांच्या दरात वाढ झाली आहे. कलिंगड, खरबूज, सीताफळ, अननस, माेसंबी, संत्री, डाळिंब, पेरु,चिकूचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी मोसंबी २५ ते ३० टन, संत्री ६० ते ७० टन, डाळिंब ४० ते ५० टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड ८ ते १० टेम्पो, खरबूज ३ ते ४ टेम्पो, चिकू एक हजार गोणी, पेरू ८०० ते ९०० प्लास्टिक जाळी (क्रेट), बाेरे दोन हजार गोणी, सीताफळ १० ते १२ टन अशी आवक झाली.

Story img Loader