पुणे  : नुकत्याच संपलेल्या हापूस हंगामाला हवामानबदलाचा मोठा फटका बसला. एकूण उत्पादनाच्या जेमतेम २० टक्केच हापूसचे उत्पादन झाले. त्यामुळे कॅनिंग उद्योगाला आंब्याच्या मोठय़ा तुटवडय़ाचा सामना करावा लागला. कॅनिंगसाठी आंबा जास्त दराने खरेदी करावा लागला, शिवाय अपेक्षित पल्प (प्युरी, रस) उत्पादन न झाल्यामुळे कॅनिंग उद्योग आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आला आहे.

कोकणातून दर वर्षी साधारणपणे एक लाख ३० हजार टन हापूस आंब्याचे उत्पादन होते. त्यातील सुमारे साठ टक्के म्हणजे ७८ ते ८० हजार टन आंबा खाण्यासाठी देशात आणि परदेशात वापरला जातो. तर सुमारे ३० टक्के म्हणजे ५० हजार टन आंबा कॅनिंगसाठी वापरला जातो. यंदा सर्व चित्रच बदलले आहे. कॅनिंगसाठी जेमतेम १० हजार टन आंबा मिळाला आहे.

overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Stock market today BSE Sensex crashes over 1000 points
मुंबई शेअर बाजार हजार अंशांनी कोसळला; डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन विक्रमी नीचांकावर
Why FIIs are selling
Stock Market Crash: १० दिवसांमध्ये FII’s नी २२,२५९ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स का विकले? वाचा ६ कारणे…
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता
Microfinance institutions loan arrears rise to 4 3 percent print eco news
बचतगटांच्या परतफेडीत कसूर; मायक्रोफायनान्स संस्थांची कर्ज थकबाकी वाढून ४.३ टक्क्यांवर
India GDP growth rate
भारताचा जीडीपी विकासदर मंदावण्याचा अंदाज चिंताजनक, पण धक्कादायक नाही! असे का?

कॅनिंगसाठी कमी आंबा मिळाल्याचा परिणाम म्हणून यंदा कॅनिंगसाठीच्या आंब्याच्या दरात वाढ झाली. सरासरी ३० ते ३५ रुपये किलो दराने दर वर्षी कॅनिंगसाठी आंब्याची खरेदी होत होती. यंदा आंब्याचा मोठा तुटवडा असल्यामुळे कॅनिंगसाठी ७० ते ७५ रुपये किलो दराने आंबा विकत घ्यावा लागला. दर वाढूनही पुरेसा आंबा कॅनिंगसाठी मिळाला नाही.

आंब्याच्या मोठय़ा तुटवडय़ामुळे अपेक्षित पल्प (प्युरी, रस) उत्पादन झाले नाही. आर्थिक गुंतवणूक सरासरीइतकी होऊनही अपेक्षित उत्पादन न झाल्यामुळे कॅनिंग उद्योगाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कॅनिंग उद्योगातील प्रस्थापित व्यावसायिकांवर याचा फारसा विपरीत परिणाम झाला नाही. मात्र, नव्याने उद्योगात आलेल्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

चिपळूण तालुक्यातील कौंढर ताम्हाणे येथील तरुण कॅनिंग व्यावसायिक अमोल भागवत म्हणाले, ‘‘मी नव्याने उद्योग सुरू केला आहे. मुळात स्वत:च्या बागेत कॅनिंगसाठी फारसा आंबा निघाला नाही. दुसऱ्यांकडून खरेदी करावा, तर यंदा उच्चांकी दर होते. इतक्या दराने आंबा खरेदी करून कॅनिंग करावा, तर वाढीव दराने विक्री होईल की नाही, याबाबतचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अपेक्षित उत्पादन झाले नाही. परिणामी माझ्यासारखे नवउद्योजक अडचणीत आले आहेत.’’

यंदा कॅनिंगसाठी अपेक्षित प्रमाणात आंबा मिळाला नाही. वाढीव दराने आंबा खरेदी करावा लागला. प्रक्रिया खर्च वाढूनही अपेक्षित पल्प उत्पादन झाले नाही. त्यामुळे बाजारात वर्षभर पल्पचा काहीसा तुटवडा असेल, शिवाय दरही तेजीत असतील.

अमर देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, देसाई प्रॉडक्ट

Story img Loader