पुणे : पावसामुळे फळभाज्यांची आवक घटली आहे. घाऊक बाजारात टोमॅटो, लसूण वगळता अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (९ जुलै) राज्य, तसेच परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> विमानतळे, मेट्रो स्टेशन, इमारतींच्या बांधकामात आता बांबूचा वापर; केंद्राच्या बांबू प्रचार आणि लागवड सदस्य पाशा पटेल यांची माहिती

गुजरात, कर्नाटकमधून मिळून १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ५ टेम्पो कोबी, हिमाचल प्रदेशातून २ टेम्पो मटार, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूतून ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून १०० गोणी भुईमूग शेंग, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ३५ ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली. पुणे विभागातून सातारी आले दोन हजार गोणी, टोमॅटो सात हजार पेटी, फ्लाॅवर ८ टेम्पो, कोबी ५ टेम्पो, भेंडी ५ टेम्पो, गवार ५ टेम्पो, काकडी ५ टेम्पाे, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा ८ टेम्पाे, कांदा ९० ट्रक अशी आवक झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fruits and vegetables supply decreased due to rain tomatoes and garlic prices increased pune print news zws 70 rbk
Show comments