पुणे : राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्याला मोठा मान मिळाला आहे. चिदानंद नाईक या विद्यार्थ्याने दिग्दर्शित केलेला हा लघुपट ‘सनफ्लॉवर्स वेअर फर्स्ट वन्स टू नो’ हा लघुपट २०२५ मधील ऑस्कर पुरस्कारातील ‘लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म’ या विभागासाठीच्या स्पर्धेत निवडला गेला आहे.

प्रतिष्ठेच्या कान महोत्सवात ल सेनेफ सिलेक्शन या विभागात ‘सनफ्लॉवर्स वेअर फर्स्ट वन्स टू नो’ पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला होता. कन्नड भाषेत असलेला हा चित्रपट लोककथा आणि परंपरा यावर बेतला आहे. सूरज ठाकूर यांनी छायांकन, मनोज व्ही यांनी संकलन, अभिषेक कदम यांनी ध्वनि आरेखनाची जबाबदारी निभावली आहे. चिदानंद एफटीआयआयमध्ये शिकत असताना लघुपटाची निर्मिती करण्यात आली होती. चित्रपट महोत्सवांच्या वर्तुळात या लघुपटाचा गौरव झाला आहे. बंगळुरू आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात या लघुपटाला सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर आता हा लघुपट ऑस्कर पुरस्कारांमध्ये जागतिक स्तरावरील लघुपटांशी स्पर्धा करणार आहे. ऑस्करमध्ये दावेदारी करताना लघुपटाचे खेळ, पत्रकार परिषदा, प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून हा लघुपट ॲकॅडमीचे अधिकाधिक प्रतिनिधी, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
BJP office bearers in Maval asserted their position to campaign for Bapu Bhegde of NCP Ajit Pawar party Pune news
देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही ‘मावळ पॅटर्न’…!
Fire decoration material godown, decoration material godown Sinhagad road area,
सिंहगड रस्ता भागात सजावट साहित्याच्या गोदामात आग, रहिवासी भागात घबराट; अर्ध्या तासात आग आटोक्यात
fight in Pimpri-Chinchwad and Maval is clear
पिंपरी-चिंचवड, मावळमधील लढतीचे चित्र स्पष्ट; ‘अशा’ होणार लढती
Pune Fire incidents, Diwali pune, pune,
पुणे : दिवाळीत ६० ठिकाणी आगीच्या घटना
election decision officer car fire, Disabled independent candidate,
दिव्यांग अपक्ष उमेदवाराने ‘या’ कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटवून दिली
no alt text set
पुण्यातील कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर या तीन मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी
Rumors bomb plane, Airline, Rumors bomb,
विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, विमान कंपनीसह प्रवाशांना मनस्ताप
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना

हेही वाचा – सिंहगड रस्ता भागात सजावट साहित्याच्या गोदामात आग, रहिवासी भागात घबराट; अर्ध्या तासात आग आटोक्यात

हेही वाचा – पुणे : दिवाळीत ६० ठिकाणी आगीच्या घटना

चिदानंद म्हणाला, की मला आठवते तेव्हापासून ही गोष्ट सांगण्याची मला इच्छा होती. केवळ गोष्टी ऐकण्यापेक्षा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचा प्रयत्न या लघुपटाद्वारे केला आहे. हा अनुभव जगभरातील प्रेक्षकांना मिळेल ही मला आशा आहे. पूर्णपणे रात्रीच्या वेळी हा लघुपट चित्रीत करण्यात आला आहे. पारंपरिक भारतीय कथनशैली आणि दृश्यप्रतिमा यांच्या मिलाफातून अस्सल मातीतली गोष्ट सांगत लोक आणि त्यांच्या कथा उलगडण्यात आल्या आहेत.