फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट (एफटीआयआय) मधील सुमारे दहा विद्यार्थ्यांवर धमकी देणे व मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संस्थेमध्ये मागील ४२ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.
संस्थेच्या कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे व्यवस्थापक संजय जयंत चांदेकर (वय ५०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजयन अडाट, विकास अर्झ, साक्षी गुलाटी व अश्विनी (पूर्ण नाव नाही) यांच्याशिवाय पाच ते सहा विद्यार्थ्यांवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्याला मानसिक त्रास देण्याबरोबरच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे चांदेकर यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी कलम १४३, १४९, ३४१ व ५०६ (अ) नुसार संबंधित विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Story img Loader