पुण्यातल्या प्रसिद्ध फिल्म टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय)  अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची सरकारने नियुक्ती केली आहे. मात्र,  एफटीआयआयच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा वाद शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे. गजेंद्र यांच्या निवडीला  विद्यार्थ्यांनी निषेध केला असून त्याविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत.
गजेंद्र हे भाजपचे सक्रीय कार्यकर्ते आहेत, त्यामुळे गजेंद्र चौहानांच्या निवडीद्वारे एफटीआयआयमध्ये राजकीय हस्तक्षेप करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. जो कधीही खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. गजेंद्र चौहान यांनी कलाकार म्हणून महाभारत मालिकेत भुमिका साकारली होती. अनेक मालिकांतून त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिकाही साकारल्या आहेत. त्यानंतर २००४ पासून ते भाजपचे पूर्णवेळ सदस्य झाले त्यामुळे यापूर्वी विख्यात कलाकारांनी भुषवलेल्या एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची गरिमा सरकार गजेंद्र चौहान यांची राजकीय नियुक्ती करुन खराब करत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
एफटीआयच्या अध्यक्षपदी गीतकार गुलझार, दिग्दर्शक शाम बेनेगल आणि अधूर गोपालकृष्णन यांची नावेही चर्चेत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा