एफटीआयआय विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलाविले आहे.
ftii
गजेंद्र चौहान यांना एफटीआयआयच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषणाला बसले होते.  मंत्रालयाने विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलविल्यानंतर विद्यार्थ्यांचे चालू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना २९ सप्टेंबरला चर्चेसाठी मुंबईमध्ये बोलाविले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी उपोषण जरी मागे घेतले असले तरी आंदोलन कायम राहणार आहे.