‘विद्यार्थ्यांचे उपोषण नियमबाह्य़ असतानाही ते सुरूच ठेवल्यास पोलीस कारवाई होणे व उपोषणकर्त्यांला सरकारी रुग्णालयात दाखल करणे अपेक्षित आहे,’ असे सांगत ‘एफटीआयआय’चे संचालक प्रशांत पाठराबे यांनी उपोषणकर्त्यां विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च प्रशासन करू शकणार नसल्याचा खुलासा केला आहे.
संस्थेच्या संचालक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना व इतर चार सदस्यांना हटवण्याच्या मुद्दय़ावरून सुरू असलेल्या संपात गुरुवारपासून विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी व शनिवारी खासगी रुग्णालयात दाखल करावे लागलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या उपचारांचा खर्च एफटीआयआय प्रशासनाने केला होता. मात्र रविवारी तिसऱ्या उपोषणकर्त्यांला खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. या वेळी प्रशासनाने त्याच्यावरील उपचारांचा खर्च करण्यास नकार दिला.
‘उपोषणकर्त्यां विद्यार्थ्यांच्या बाबतीत पोलिसांनी कारवाई करणे व उपोषणकर्त्यांला सरकारी रुग्णालयात दाखल करणे अपेक्षित आहे,’ असेही पाठराबे यांनी खुलाशात म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा