कार्ला येथील एकवीरा मंदिराचे जतन, संवर्धन आणि परिसर विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमआसआरडीसी) ३९ कोटी ४३ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या अंतर्गत विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळात दिली.

हेही वाचा >>>पुणे: आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Subsidy e-rickshaw Pimpri, Pimpri municipal corporation,
पिंपरी : ई-रिक्षाधारकांना ३० हजार रुपये अनुदान; काय आहे महापालिकेचा उपक्रम?
cm devendra fadnavis gharkul scheme
Devendra Fadnavis : सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे, शिल्प व लेणींचे जतन-संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते महामंडळाची (एमएसआरडीसी) निवड केली आहे. त्या अंतर्गत एकवीरा देवीच्या मंदिराचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे, लेणी आणि शिल्पांच्या संवर्धनातून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे.या पार्श्वभूमीवर कार्ला येथील एकवीरा मंदिराबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पर्यटनमंत्री लोढा यांनी ही माहिती दिली.

पर्यटनमंत्री लोढा म्हणाले, ‘कार्ला येथील एकवीरा देवी मंदिर व परिसराचा विकास व संरक्षण करण्याबाबत श्री एकवीरा आई भक्त भाविक मंडळाने चालू वर्षी मे महिन्यात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. एकवीरा मंदिर पायथ्याकडे जाण्यासाठी २.२० किलोमीटर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. मंदिर पायथ्याशी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्वच्छतागृह, उपाहारगृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत महिला, पुरुष आणि शारीरिक विकलांग नागरिकांसाठी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. मंदिराचे जतन, संवर्धन आणि परिसर विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ३९ कोटी ४३ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.’

हेही वाचा >>>पुणे: कोथरुडमध्ये मित्राचा खून करुन आत्महत्येचा बनाव; एकाला अटक

रज्जू मार्ग प्रस्तावित
एकवीरा देवी मंदिरात दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येतात. सह्याद्री पर्वताच्या कुशीतील कार्ला येथील डोंगरावर हे मंदिर आहे. त्यामुळे पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. लोकप्रिय तीर्थक्षेत्र असल्याने आणि जवळ कार्ला लेणी पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे एकवीरा मंदिर येथे रज्जू मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या मंदिराची पाहणी करण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या ‘वॉर रूम’चे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर या ठिकाणचा रज्जू मार्ग प्रकल्पही रस्ते महामंडळाने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याला राज्य शासनाची मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे पर्यटन विभागाऐवजी आता हा प्रकल्प महामंडळाकडे वर्ग करण्यात आला आहे.

Story img Loader