चालू वर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपीक, फळपिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाच कोटी २८ लाख रुपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्यापैकी तीन कोटी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे वाटप सुरू करण्यात आले आहे.पुणे जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे ९१९२ शेतकऱ्यांच्या २२४७ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. शेतीपिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी तीन कोटी १८ लाख रुपये, शेतजमीन नुकसानीसाठी १५ लाख रुपये, मृत जनावरांसाठी ७४ लाख रुपये, पूर्णतः नष्ट, पडझड, कच्ची-पक्की घरे, झोपड्या आणि गोठ्यांसाठी एक कोटी २० लाख रुपये अशा एकूण पाच कोटी २८ लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यापैकी तीन कोटी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्याचे वितरण स्थानिक पातळीवर केले जात आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा