सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या संशोधनासाठी ‘व्हीआयआयटी’ला (विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी) भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) २१ लाख ३९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
टाटा मूलभूत संशोधन संस्थेकडून (टीआयएफआर) आलेल्या मूलभूत संशोधन निधीतून या प्रकल्पाचा प्रस्ताव ‘इस्रो’ला सादर करण्यात आला होता. त्याला प्रतिसाद देत इस्रोतर्फे संशोधनासाठी हा निधी मंजूर करण्यात आला असून दोन वर्षांत हे संशोधनाचे काम पूर्णत्वास नेण्यात येणार असल्याची माहिती ‘व्हीआयआयटी’च्या प्राचार्या बिलावरी करकरे आणि विभागप्रमुख डॉ. प्रल्हाद खांडेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन्स विभागामध्ये सौरऊर्जेवर कार्यान्वित होणारी प्रयोगशाळा विकसित करण्यात येणार असून प्रा. विवेक आराणके हे या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख आहेत. डॉ. चंद्रशेखर गरदे आणि प्रा. मििलद पाटील सहायक संशोधक आहेत.