नाना पेठेतील पंचशील रुग्णालयात सलाइनच्या बाटलीत बुरशी सापडल्याचे बुधवारी निदर्शनास आले होते. अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) या रुग्णालयातील सलाइनच्या साठय़ाचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आले असून प्रथमदर्शनी केवळ एकाच बाटलीत बुरशीजन्य पदार्थ आढळल्याची माहिती विभागाचे सह आयुक्त रा. ए. भिलारे यांनी दिली आहे.
औषध निरीक्षक शा. कि. महिंद्रकर आणि म. वि. देशपांडे यांनी या प्रकरणाची चौकशी करून चाचणी व विश्लेषणासाठी उर्वरित साठय़ातून नमुने घेतले आहेत. हा २३ बाटल्यांचा साठाही प्रतिबंधित करण्यात आला आहे. सलाइनच्या ज्या बाटलीत बुरशी होती त्या बाटलीच्या तळाशी छिद्र असल्याचे आढळले आहे. सलाइनचा या साठय़ाचे उत्पादन गुजरातमधील ‘निरमा लिमिटेड-हेल्थ केअर डिव्हिजन’ या कंपनीने केले आहे. बुरशी आढळलेली सलाइनची बाटली रुग्णासाठी वापरण्यात न आल्याचे एफडीतर्फे करण्यात आलेल्या चौकशीत दिसले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा