पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली असली, तरी व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम, गृहविज्ञान शाखा, रात्र कनिष्ठ महाविद्यालये यांची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईनच होत आहे. द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेशही महाविद्यालयीन स्तरावर करण्यात येणार आहे.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया गेल्या वर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली. मात्र, विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे गृहविज्ञान शाखा आणि रात्र कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांच्या स्तरावर ऑफलाईन पद्धतीनेच करण्यात येणार आहे. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. द्विलक्षी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विज्ञान शाखेसाठी झालेल्या प्रवेशातून महाविद्यालयाच्या स्तरावर होणार आहे.
राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्रांवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांची पडताळणी शाळा प्रमुखांकडून करून घ्यायची आहे. इतर शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालय, नेस वाडिया महाविद्यालय, पिंपरी येथील जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय या केंद्रांवर अर्ज भरता येतील.
अर्ज भरताना
– पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी शाळा किंवा केंद्रावरून मार्गदर्शन पुस्तिका खरेदी करावी.
– या पुस्तिकेबरोबर विद्यार्थ्यांना लॉग-इन अ‍ॅड्रेस आणि पासवर्ड देण्यात येतो. तो वापरून लॉग-इन करावे
– पहिल्यांदा लॉग-इन केल्यानंतर पासवर्ड बदलून टाकावा. त्याचवेळी सुरक्षेसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
– राज्य मंडळाची दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना शाळेचे नाव आणि परीक्षा क्रमांक टाकल्यावर त्यांची मंडळाकडील माहिती अर्जात आपोआप भरली जाईल. ती तपासून अर्ज पूर्ण करा.
– अर्ज भरल्यानंतर कन्फर्म बटणावर क्लिक करून तो निश्चित करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा