पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये केंद्रीय प्रवेश समितीतर्फे राबवण्यात येणारी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये प्राथमिक माहिती भरायची आहे. शाळा आणि विभागीय केंद्रांवर माहिती पुस्तकांची विक्रीही सुरू झाली आहे.
 अकरावीची ऑनलाइन प्रक्रिया १ जूनपासून सुरू होणार होती. मात्र वेळेच्या आधी माहिती पुस्तिका विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने या पुस्तिकेची विक्री आणि प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. या वर्षी ६६ हजार जागांसाठी प्रवेशप्रक्रिया होणार असून ८५ हजार माहिती पुस्तिका छापण्यात आल्या आहेत. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांबरोबरच दहावीचा वर्ग असलेल्या सुमारे ६०० शाळांमध्ये आणि ९ विभाग केंद्रांवर माहिती पुस्तिकांची विक्री सुरू झाली आहे. माहिती पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे. पुस्तकाबरोबर देण्यात आलेला पासवर्ड वापरून आणि दिलेल्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांनी अर्जामधील प्राथमिक माहिती भरायची आहे. संकेतस्थळावरही माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत.
प्रवेशप्रक्रिया एकूण तीन टप्प्यांत होणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरताना किमान ४० महाविद्यालयांचा पसंतीक्रम देणे बंधनकारक आहे. जास्तीत जास्त ५० महाविद्यालयांना पसंती देता येईल. कोणत्याही दोन शाखांसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र, एकदा अकरावीला प्रवेश मिळाल्यानंतर बारावीसाठी महाविद्यालय बदलता येणार नाही. प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रियेचे मुख्य केंद्र असलेल्या कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयांत मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे.
प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती http://pune.fyjc.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मार्गदर्शन वर्गाचे वेळापत्रक
सोमवार (१ जून) – सकाळी १० – असेंब्ली हॉल, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रस्ता, सकाळी ११ – श्री म्हाळसकांत कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डी, साधना कनिष्ठ महाविद्यालय, हडपसर, दुपारी २ – जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय, पिंपरी
मंगळवार (२ जून) – सकाळी १० – शामराव कलमाडी कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालय, कर्वेनगर,  सकाळी १०.३० – मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर, सकाळी ११ – मुक्तांगण कनिष्ठ महाविद्यालय, शिवदर्शन, साधना कनिष्ठ महाविद्यालय, हडपसर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा