‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ आणि महात्मा फुले यांच्या जीवनावरील ‘सत्यशोधक’ या नाटकांमुळे ख्यातकीर्त असलेले ज्येष्ठ नाटककार समीक्षक आणि विचारवंत गोविंद पुरुषोत्तम ऊर्फ गो. पु. देशपांडे (वय ७४) यांचे दीर्घ आजाराने बुधवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्यामागे कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
पुणे विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राच्या प्राध्यापिका डॉ. शर्मिला रेगे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी झालेल्या सभेस उपस्थित असतानाच गोपुंना त्रास होऊ लागला. तेथून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
गो. पु. देशपांडे यांचा जन्म २ ऑगस्ट १९३८ रोजी नाशिक येथे झाला. सातारा जिल्ह्य़ातील रहिमतपूर येथे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी बडोदा येथून पदवी तर, पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर घेतली. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. संपादन केली. तेथेच इंटरनॅशनल स्टडीज अँड चायनीज स्टडीज विभागामध्ये प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. चीनविषयक त्यांचे विचार हे वेगळाच दृष्टिकोन देणारे आहेत. निवृत्तीनंतर गोपु पुण्यामध्ये स्थायिक झाले.
गोपु किंवा जीपीडी अशी अद्याक्षरे हीच ओळख असलेल्या देशपांडे यांच्या साहित्याचा हिंदी, इंग्लिश, कानडी, तमीळ अशा भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. या निर्मितीमध्ये राजकीय समीक्षा, दूरचित्रवाणी मालिका, चित्रपटाचे संवादलेखन आणि अभिनय अशा सर्व प्रांतात मुशाफिरी करीत गोपुंनी आपला ठसा उमटविला. भारतीय संतसाहित्य, मार्क्‍सवाद, चीनचा जागतिक अर्थकारणाशी असलेला संदर्भ अशा विषयांवरील त्यांचे विचार वेगळा दृष्टिकोन ठेवतात. नाटय़विषयक विचार, भाषा, काव्य, डावी विचारसरणी यांसह चीनसारख्या राष्ट्राचा राजकीय, आर्थिक प्रवास अशा विषयांवरील त्यांची व्याख्याने ही श्रोत्यांसाठी जणू मौलिक चिंतनाची मैफलच असायची. अनिल सडोलीकर यांनी गोपुंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणाऱ्या ‘बहुआयामी गो. पु.’ या लघुपटाची निर्मिती केली असून ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले होते.
गो. पु. देशपांडे यांची साहित्यसंपदा-

नाटके : उद्ध्वस्त धर्मशाळा, मामका: पांडवाश्चैव, अंधारयात्रा, सत्यशोधक, चाणक्य विष्णुगुप्त, शेवटचा दिस, रस्ते, म्युझिक सिस्टिम, अस्सा नवरा नको गं बाई
कवितासंग्रह : इत्यादी इत्यादी कविता
समीक्षात्मक लेखन : मराठी – संतसाहित्य, भारतीय तत्त्वज्ञान, इंग्रजी – डायलेक्टीक्स ऑफ डिफीट, टॉकिंग पॉलिटिकल कल्चरली, द वर्ल्ड ऑफ आयडियाज इन मॉडर्न मराठी
संपादन : आर्ट्स अँड आयडीयाज मॅगझीन
दूरचित्रवाणी मालिकांसाठी लेखन : भारत एक खोज, शिवाजी, महात्मा ज्योतिबा फुले, चाणक्य, सुरत काँग्रेस<br />चित्रपट संवादलेखन : द्रोहकाल, देव

Screening of Marathi films in theatres Municipal administration responds positively to artists demand Pune news
नाट्यगृहांमध्ये आता मराठी चित्रपटांचे प्रदर्शन; कलाकारांच्या मागणीला महापालिका प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Who is George Soros
जॉर्ज सोरोस कोण आहेत? भाजपला त्यांच्याविषयी इतका राग का? ते खरेच ‘काँग्रेसमित्र’ आणि ‘भारतशत्रू’ आहेत का?
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !

अन्य भाषांमध्ये अनुवादित झालेली नाटके :
उद्ध्वस्त धर्मशाळा- हिंदी, इंग्लिश, बंगाली, गुजराती, कन्नड, तमीळ
एक वाजून गेला आहे- हिंदी, इंग्लिश, बंगाली
सत्यशोधक- हिंदी

अभिनय : नाटक– घाशीराम कोतवाल, एक तमाशा अच्छा खासा, चित्रपट – थांग, पुणे ५२
पुरस्कार : संकलित लेखनासाठी महाराष्ट्र राज्य सरकार सन्मान १९७७, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार १९९६, सातारा भूषण पुरस्कार

Story img Loader