‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ आणि महात्मा फुले यांच्या जीवनावरील ‘सत्यशोधक’ या नाटकांमुळे ख्यातकीर्त असलेले ज्येष्ठ नाटककार समीक्षक आणि विचारवंत गोविंद पुरुषोत्तम ऊर्फ गो. पु. देशपांडे (वय ७४) यांचे दीर्घ आजाराने बुधवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्यामागे कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
पुणे विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राच्या प्राध्यापिका डॉ. शर्मिला रेगे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी झालेल्या सभेस उपस्थित असतानाच गोपुंना त्रास होऊ लागला. तेथून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
गो. पु. देशपांडे यांचा जन्म २ ऑगस्ट १९३८ रोजी नाशिक येथे झाला. सातारा जिल्ह्य़ातील रहिमतपूर येथे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी बडोदा येथून पदवी तर, पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर घेतली. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. संपादन केली. तेथेच इंटरनॅशनल स्टडीज अँड चायनीज स्टडीज विभागामध्ये प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. चीनविषयक त्यांचे विचार हे वेगळाच दृष्टिकोन देणारे आहेत. निवृत्तीनंतर गोपु पुण्यामध्ये स्थायिक झाले.
गोपु किंवा जीपीडी अशी अद्याक्षरे हीच ओळख असलेल्या देशपांडे यांच्या साहित्याचा हिंदी, इंग्लिश, कानडी, तमीळ अशा भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. या निर्मितीमध्ये राजकीय समीक्षा, दूरचित्रवाणी मालिका, चित्रपटाचे संवादलेखन आणि अभिनय अशा सर्व प्रांतात मुशाफिरी करीत गोपुंनी आपला ठसा उमटविला. भारतीय संतसाहित्य, मार्क्सवाद, चीनचा जागतिक अर्थकारणाशी असलेला संदर्भ अशा विषयांवरील त्यांचे विचार वेगळा दृष्टिकोन ठेवतात. नाटय़विषयक विचार, भाषा, काव्य, डावी विचारसरणी यांसह चीनसारख्या राष्ट्राचा राजकीय, आर्थिक प्रवास अशा विषयांवरील त्यांची व्याख्याने ही श्रोत्यांसाठी जणू मौलिक चिंतनाची मैफलच असायची. अनिल सडोलीकर यांनी गोपुंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणाऱ्या ‘बहुआयामी गो. पु.’ या लघुपटाची निर्मिती केली असून ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले होते.
गो. पु. देशपांडे यांची साहित्यसंपदा-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा