पुणे : जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाची बैठक १२ ते १४ जून दरम्यान पुण्यात होणार आहे. ‘डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा’, ‘सायबर सुरक्षा’ आणि ‘डिजिटल कौशल्य विकसन’ या प्रमुख तीन मुद्द्यांवर परिषदेत चर्चा करून ठरावाचा अंतिम मसुदा तयार करण्यात येईल.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत या बाबत माहिती दिली. सहसचिव सुशील पाल, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार या वेळी उपस्थित होते. ‘जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) शिखर परिषद ‘ आणि जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा(डीपीआय) प्रदर्शनाच्या उद्घाटनाने सोमवारी बैठकीची सुरुवात होईल. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते उद्घाटन होईल. उद्घाटन सत्रात इंडिया स्टॅक अर्थात लोकसंख्येच्या प्रमाणात यशवीरित्या लागू केलेल्या डिजिटल उपाययोजना सामायिक करण्यासाठी इच्छुक देशांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जाईल. परिषदेत विविध देशांतील सुमारे तीनशे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा >>>पुणे: पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावणारी चोरट्यांची टोळी गजाआड

शर्मा म्हणाले, की डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या या पूर्वी दोन बैठका झाल्या आहेत. मात्र पुण्यातील बैठक अधिक महत्त्वाची आहे. कारण या बैठकीत डिजिटल अर्थव्यवस्था, सायबर सुरक्षा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सेवा या तीन मुद्द्यांशी संबंधित जनतेच्या सक्षमीकरणासाठी डिजिटल ओळख, डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय समावेशन, न्याय व्यवस्था आणि नियमांसाठी डीपीआय, कार्यक्षम सेवा वितरणासाठी डिजिटल दस्तऐवज विनिमय’, ‘सार्वजनिक प्रमुख डीपीआय’, ‘डिजिटल शिक्षण आणि कौशल्य, डिजिटल आरोग्य आणि हवामान बदलासंदर्भातील कृतीसाठी डीपीआय, डिजिटल कृषी व्यवस्था, आणि जागतिक डीपीआय व्यवस्था तयार करणे अशा विविध विषयांवर चर्चा करून ठरावांचा अंतिम मसुदा तयार होईल. बैठकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी जी२० सदस्य, निमंत्रित अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था ‘डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा’, ‘सायबर सुरक्षा’ आणि ‘डिजिटल कौशल्य विकास’ या विषयांवर चर्चा करतील.

हेही वाचा >>>Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023 आळंदी: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; लाखो वारकऱ्यांनी पाहिला सोहळा..

पुणे माहिती तंत्रज्ञान कंपन्या, नवउद्यमी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या बैठकीसाठी पुण्याची केलेली निवड योग्य आहे. शहराची संस्कृती, पालखी सोहळ्याचा अभूतपूर्व अनुभव परदेशी पाहुण्यांना मिळेल. परिषदेसाठीची आवश्यक तयारी करण्यात आली आहे, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

प्रदर्शनाचे आयोजन

कार्यगटाच्या बैठकीबरोबरच जागतिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देशात विकसित केलेल्या महत्त्वाच्या १४ ऑनलाइन प्रणाली मांडल्या जाणार आहेत.

Story img Loader