पुणे येथील कुख्यात गुंड गजा मारणे याला सातारा पोलिसांनी मेढा ( ता.जावळी) परिसरातून शनिवारी सायंकाळी ताब्यात घेतले. कायदेशीर प्रक्रियेनंतर शनिवारी रात्रीच सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी पुणे ग्रामीण पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय देवकर यांच्या ताब्यात दिले.

कुख्यात गुंड गजा मारणे मेढा पोलिसांच्या ताब्यात

फरारी असणारा गजा मारणे हा साथीदारांसमवेत महाबळेश्वर, वाई, मेढा भागात असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मेढा चौकात गाड्यांची तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान पोलिसांनी (एम एच १२ क्यू वाय २१६७ ) हे वाहन अडवले. त्यात चार व्यक्ती होत्या . त्यापैकी टी-शर्ट आणि हाफ चड्डी अशा पेहरावत मारणे होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. तसेच, शनिवारी रात्री मेढा पोलिसांनी त्याच्यासह सुनील बनसोडे, संतोष शेलार, सचिन घोलप या तिघांना देखील ताब्यात घेतले. शिवाय, या गाडीतून दीड लाखाची रोकडसुद्धा जप्त करण्यात आली. या चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एपीआय देवकर यांच्या ताब्यात दिले.

फुकटात वडापाव, सँडविच आणि टोल न भरल्याप्रकरणी गजा मारणेवर खंडणीचा गुन्हा, ‘मोक्का’ लागण्याचीही शक्यता

येरवडा कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध –
“गुंड गजानन मारणे विरोधात तळोजा ते पुण्यापर्यंत काढलेल्या जंगी मिरवणुकी प्रकरणी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. त्यानंतर गजानन मारणे फरार झाला. त्याच्या शोधासाठी आमची पथके अनेक ठिकाणी रवाना झाली होती. त्या दरम्यान कोकण, महाबळेश्वर, कोल्हापूर या ठिकाणी फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार काल त्याला मेढा येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून आज(रविवार) सकाळी १० वाजेच्या सुमारास येरवडा कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.” अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे.

Story img Loader