पुणे: नाना पेठेत एका जुगार अड्ड्यावर पोलिस कारवाई करण्यासाठी गेले होते. मात्र त्यावेळी पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने जुगार खेळणाऱ्यांमधील एकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि त्या व्यक्तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ब्रायन रुडाल्फ गिअर (वय ५४) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा >>> वैज्ञानिक संशोधन आता अधिक वेगवान… संशोधन संस्थांमध्ये स्वदेशी बनावटीचे महासंगणक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नाना पेठेतील क्राईस्ट चर्च समोरील एका सोसायटीमधील दुसऱ्या मजल्यावर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेची एक टीम त्या ठिकाणी छापा टाकण्यास गेली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्यावर दरवाजावर थाप टाकली आणि आतमधील एका व्यक्तीने दरवाजा उघडला. आम्हाला पाहताच, पोलिस आल्याचा त्याने सर्वांना आवाज दिला. यामुळे आतमध्ये पत्ते खेळत असलेल्या लोकांनी गॅलरीमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली. मात्र त्यावेळी ब्रायन रुडाल्फ गिअर याने पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने खाली उडी मारली.

हेही वाचा >>> Video: चिंचवडच्या आरोपीने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले

या घटनेमध्ये तो जखमी झाल्याने त्याला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ब्रायन रुडाल्फ गिअर याचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या प्रकरणी संबधित जुगार चालविणारा मालक आणि त्यावेळी खेळत असलेल्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.