िपपरी महापालिकेने २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींचे पुन्हा पुनर्वसन करण्याचा घाट घालण्यात आला व स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूरही केला. तथापि, अंतिम मान्यतेसाठी पालिका सभेत हा प्रस्ताव आल्यानंतर तो दप्तरी दाखल करण्यात आला. हा प्रशासनाचा नव्हे तर सदस्यांचा प्रस्ताव असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी सुरुवातीलाच हात झटकले होते.
महापालिकेने १९८७ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला होता, तेव्हा या प्रकल्पाअंतर्गत साडेतीन कोटी रुपये खर्च करून भाटनगर, अशोकनगर, बौध्दनगर भागात १७ इमारती बांधण्यात आल्या होत्या. सद्यस्थितीत या इमारतींची प्रचंड दुरवस्था झाल्याने त्यात राहणे धोकादायक आहे. पुण्यात तळजाई टेकडीवरील इमारत दुर्घटनेचा अनुभव पाहता या इमारतींमध्ये खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे सांगत भाटनगर प्रकल्पातील इमारतींचे ‘एसआरए’ अंतर्गत पुनर्वसन करावे, अशी मागणी पुढे आली. तसेच लगतच्या बौध्दनगर, रमाबाईनगर, निराधारनगर येथील नागरिकांचे त्या ठिकाणी पुनर्वसन करून मिळावे, अशी नागरिकांची मागणी असल्याचा युक्तिवाद लोकप्रतिनिधींनी केला व या इमारतींचे पुन्हा पुनर्वसन करण्याचा घाट घातला होता. स्थायी समितीच्या बैठकीत १७ नोव्हेंबरला मान्यता मिळाली. तथापि, अंतिम मान्यतेसाठी तो प्रस्ताव पालिका सभेसमोर आल्यानंतर तो दप्तरी दाखल करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा