साधना आणि सेवाग्राम कलेक्टिव्हतर्फे ४ मार्च रोजी प्रकाशन

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी हे नाव उच्चारताच त्यांच्याविषयी आदर बाळगणारे आहेत तसेच त्यांच्यावर टीका करणारेदेखील आहेत. हे ध्यानात घेऊन या व्यक्तिमत्त्वाच्या विविधांगी पैलूंचा वेध घेणारा ‘गांधींविषयी’ हा तीन खंडांत्मक प्रकल्प साधना ट्रस्ट आणि सेवाग्राम कलेक्टिव्ह यांनी सिद्ध केला आहे. लोकमान्य टिळक यांनी गांधींवर १९१५ मध्ये लिहिलेला लेख, ते २०१५ मध्ये श्याम पाखरे आणि चैत्रा रेडकर यांचे लेख असा शंभर वर्षांचा कालखंड या खंडांतून उलगडणार आहे.

Khashaba Jadhav, Olympic , Bronze Medal ,
खाशाबा आज हयात असते तर…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Sudhir Mungantiwar Devendra Fadnavis (1)
निमंत्रण पत्रिकेत शेवटी नाव, मुनगंटीवार नाराज? फडणवीस खुलासा करत म्हणाले, “आम्ही वाघ व वारांचा…”
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
Mahatma Gandhi Laxman Shastri Joshi British Railways
तर्कतीर्थ विचार: महात्मा गांधींच्या सहवासात…

गांधीजींचे दीडशेवे जयंती वर्ष सुरू झाले तेव्हा ‘साधना’ने गांधीजींसंदर्भात अनेक लेख, लेखमाला, विशेषांक आणि पुस्तके असे बरेचसे काम गेल्या तीन वर्षांत केले. त्याचा सर्वोच्च उत्कर्षिबदू म्हणून ‘गांधींविषयी’ या तीन खंडांकडे बघता येईल. ‘गांधी : जीवन आणि कार्य’, ‘गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व’ व ‘गांधी : खुर्द आणि बुद्रुक’ या तीन खंडांचे संपादन अनुक्रमे किशोर बेडकिहाळ, अशोक चौसाळकर आणि रमेश ओझा यांनी केले आहे. संपादक मंडळामध्ये रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ, सुगन बरंठ, प्रदीप खेलुरकर आणि विजय तांबे यांचा समावेश होता, अशी माहिती साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी दिली.

साधना साप्ताहिकाने गेल्या ७४ वर्षांत गांधीजींविषयीच्या विखुरलेल्या स्वरूपातील लेखांचे संकलन करावे, अशी कल्पना होती. त्याखेरीज अन्य नियतकालिकांमधील लेख निवडले तर गांधीजींविषयीचे संकलन सर्वसमावेशक होईल, असा विचार पुढे आला. या तीन खंडांमध्ये ४४ लेखकांच्या ७४ लेखांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर गांधीजींनी लिहिलेल्या चरित्राला लोकमान्य टिळक यांनी लिहिलेली प्रस्तावना समाविष्ट करण्यात आली आहे. प्रसिद्ध चित्रकार-छायाचित्रकार अतुल दोढिया यांनी निवडून दिलेली गांधीजींची वेगवेगळय़ा प्रसंगांतील चित्रे मुखपृष्ठासाठी वापरण्यात आली आहेत. ही चित्रे का निवडण्यात आली याचे स्पष्टीकरण देणारा अभिजित रणदिवे यांचा लेख प्रत्येक खंडामध्ये आहे. गांधीजींचे राजकीय, धर्मविषयक, सामाजिक सुधारणा, आंतरराष्ट्रीय संबंध, राष्ट्रवाद, निसर्ग आणि आहार या विषयांवरचे लेख आणि गांधीजींची प्रस्तुतता या खंडांतून अधोरेखित झाली आहे. सेनापती बापट रस्त्यावरील द युनिक अॅकॅडमी सभागृह येथे ४ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते ‘गांधींविषयी’चे प्रकाशन होणार आहे, असे शिरसाठ यांनी सांगितले.

‘गांधींविषयी’ खंडांमध्ये समाविष्ट लेखक-विचारवंत

– पं. जवाहरलाल नेहरू , आयार्य विनोबा भावे, आचार्य जावडेकर, रवींद्रनाथ टागोर,  तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,  दि. के. बेडेकर,  वसंत पळशीकर,  नरहर कुरुंदकर,  नानासाहेब गोरे,  रावसाहेब पटवर्धन,  मे. पुं. रेगे,  आचार्य भागवत,  वि. स. खांडेकर, गं. बा. सरदार, रामदास भटकळ

समाजवादी, मार्क्सोवादी, गांधीवादी, रॉयवादी, सर्वोदयवादी अशा विविध विचारप्रवाहातील मान्यवरांच्या लेखांतून गांधीजी समग्रपणे उलगडतील असा प्रयत्न केला आहे. गांधीजींवर टीका करणारे, मर्यादा दाखविणारे आणि महानता सांगणारे लेख आहेत. गांधीजींवर टीका करायची असेल त्या लोकांनाही या खंडांतून काही चांगले मुद्दे मिळणार आहेत.  – विनोद शिरसाठ, संपादक,  साधना साप्ताहिक

Story img Loader