पुणे : वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान बारीक डोळे अशा मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशात महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. यंदा देखील विविध शुभचिन्हांनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात गणेशजन्म सोहळा उत्साहात पार पडला. मंदिरात केलेल्या मनोहारी पुष्पसजावटीचे दृश्य डोळ्यात साठविण्यासोबतच शेकडो गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत सुख-समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना श्रीं चरणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने श्री गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला ट्रस्टचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, प्रियांका गोडसे आणि ओंकार मोझर, वृषाली मोझर यांच्या हस्ते गणेशजन्माचे पूजन झाले. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि बाल गणेशाची रुपे पुष्पसजावटीमध्ये साकारण्यात आली होती.

हेही वाचा – पुणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ओला, उबरकडून केराची टोपली! कॅबचालक बेमुदत बंदच्या तयारीत

हेही वाचा – मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ उद्या पिंपरी-चिंचवड बंदची हाक

अर्चना भालेराव यांसह इतर महिलांनी जन्माचा पाळणा, गणेश गीत व गणपतीचा गजर केला. मुख्य जन्म सोहळ्याच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. गणराज गजानन गावा हो, राजा गजानन गावा हो…हे गीत देखील सादर केले. लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह देशभरातून आलेल्या गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.