पुणे : पुणे बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी, अडते मतदारसंघातून जय शारदा गजानन पॅनेलचे गणेश घुले, अनिरुद्ध भोसले विजयी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेश घुले यांना सर्वाधिक मते मिळाली. घुले पाच हजार ८५२ मते मिळवून विजयी झाले. अनिरुद्ध भोसले यांना पाच हजार ८१६ मते मिळाली. व्यापारी अडते संघातील १३ हजार १७४ मतदारांपैकी आठ हजार ७०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची झाली होती. निवडणुकीत बाजार समितीचे माजी संचालक विलास भुजबळ यांच्यासह अमोल घुले, सौरभ कुंजीर पराभूत झाले. व्यापारी अडते मतदारसंघातील आठ हजार २९१ मते वैध ठरली. ४१६ मते अवैध ठरली.

हेही वाचा – पुणे : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १३ जागांवर राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपाच्या पॅनलचा दणदणीत विजय

पराभूत झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे – सौरभ कुंजीर – १६४०, अशोक गावड, १२८, अमोल घुले – ३७४, रमेश बडदे – ३२, सुहास बनसोडे – १९, उमर फारुख बागवान – १५९, बाळासाहेब भिसे – १९४, विलास भुजबळ – ६५०, अविनाश शेवते – ३८, शिवाजी सूर्यवंशी – १२७०