पिंपरी-चिंचवड उद्योगनरीत जलाभिषेकात गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. सायंकाळी पाचनंतर सार्वजनिक गणेश मंडळे विसर्जन मार्गावर येण्यास सुरुवात झाली. गणरायाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज भावपूर्ण, भक्तीमय वातावरणात निरोप दिला जात आहे. ढोल, ताशाचे वादन, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा अखंड जयघोष…अशा जयघोषात मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पारंपरिक तालवाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप दिला जात आहे.
हेही वाचा >>> पुणे : एकीकडे विसर्जनाचा उत्साह, दुसरीकडे पावसाच्या पाण्याने वाहणारे रस्ते
प्रमुख मंडळे विसर्जन मार्गावर येण्यास सुरुवात झाली आहे. चिंचवडगाव येथील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाची मिरवणूक सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहे. चापेकर चौकातील नवतरुण मंडळाची विसर्जन मिरवणूक सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुरू होईल. आकुर्डी येथील नवतरुण मित्र मंडळाची मिरवणूक संध्याकाळी साडेसहा वाजता सुरु होणार आहे. दरम्यान, सकाळी घरगुती गणपतीला निरोप देण्यात आला. नदीघाट, कृत्रिम तलाव आणि फिरते विसर्जन केंद्र या ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.