पुणे : दहा दिवसांपासून मनोभावे सेवा करणाऱ्या गणेशभक्तांना आता वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याचे वेध लागले आहेत. ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकातील कलाकारांनी वाजविलेल्या सुरेल सुरावटी, शंखनिनाद अशा पारंपरिक मराठमोळ्या वातावरणात विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते सज्ज झाले असून मानाच्या गणपती मंडळांची पथके निश्चित झाली आहेत. सर्वांनाच आता मंगळवारी (१७ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा >>> पुण्यात शिंदे गटाच्या वाट्याला केवळ एकच जागा ?

national commission for Medical Sciences announced exam schedule for students studying abroad
परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Imtiaz Jalil will contest assembly elections from Aurangabad East
इम्तियाज जलील औरंगाबाद पूर्व मधून निवडणुकीच्या रिंगणात
Snack materials became expensive, Snack,
फराळाचे साहित्य महागले
PET, LLM, Pre-Entrance Examinations, Mumbai University,
मुंबई विद्यापीठाकडून ‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांसाठी नावनोंदणी सुरू, ‘एलएलएम’, ‘पेट’ची प्रवेशपूर्व परीक्षा ‘या’ तारखांना
pune airport, bhopal, Bangkok, air flights
पुण्याहून हवाई प्रवास सुसाट…भोपाळपासून बँकॉकपर्यंत उड्डाण! पुणे विमानतळाचे हिवाळी वेळापत्रक जाणून घ्या…
PGCIL Trainee Recruitment 2024 Applications begin for 795 posts link to register here
PGCIL Trainee Recruitment 2024: ७९५ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि शेवटची तारीख
Surya In Tula Rashi
पुढील काही तासांत सूर्याचा जबरदस्त प्रभाव; स्वाती नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ राशींचे चमकणार भाग्य

पुण्यातील गणेशोत्सवाचे वैभव असलेली लक्ष्मी रस्त्यावरील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मंगळवारी (१७ सप्टेंबर) अनंत चतुदर्शीला होत आहे. गणरायाला वाजतगाजत निरोप देण्यासाठी मानाच्या गणेश मंडळांसह मध्यवर्ती पुण्यातील सर्वच मंडळाची विसर्जन मिरवणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मिरवणुकीसाठी मंडळांनी विद्युत रोषणाई आणि फुलांच्या आरास करून रथ साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता मान्यवरांच्या हस्ते श्री कसबा गणपतीची आरती झाल्यावर वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

हेही वाचा >>> ‘ससून’चा पैसा सगळे मिळून खाऊ! रुग्णालयातील ४ कोटी रुपयांना असे फुटले पाय…

कसबा गणपती मंडळ

– मिरवणूक पारंपरिक पद्धतीने सकाळी साडेदहा वाजता चांदीच्या पालखीतून निघणार

– उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती

– रमणबाग ढोल-ताशा पथक, गणेशोत्सवाची माहिती देणारा विशेष रथ,

– परशुराम आणि रूद्रगर्जना ढोल-ताशा पथक, प्रभात बँडपथक

– आर्ट ऑफ लिव्हिंग, कामायनी संस्था, रोटरी क्लबच्या परदेशी पाहुण्याचा मिरवणुकीत सहभाग

तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळ

– गणरायाची मिरवणूक चांदीच्या पालखीतून

– सतीश आढाव यांचे नगारावादन

– न्यू गंधर्व ब्रास बँड

– समर्थ प्रतिष्ठान ‘भगवाधारी’ ताल रूपात अयोध्यापती अवतरणार

– शिवमुद्रा ढोल-ताशा पथक

– मल्हारी मार्तंड- खंडोबाचा जागर

– विष्णूनाद शंखपथक

गुरुजी तालीम मंडळ

– फुलांच्या आकर्षक सजावटीतून साकारलेल्या ‘सूर्य’रथामध्ये गणरायाची मूर्ती विराजमान

– जयंत नगरकर यांचे नगारावादन

-अश्वराज ब्रास बँडपथक

– गर्जना ढोल ताशा पथक, तृतीयपंथीयांचे शिखंडी पथक

– आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा सहभाग

– ‘नादब्रह्म’ सर्व वादक ढोल ताशा पथक

तुळशीबाग मंडळ

– फुलांनी सजविलेल्या जगन्नाथ पुरी रथामध्ये विराजमान गणरायाची मूर्ती

– रथावर श्री जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा या देवतांच्या मूर्ती

– जगन्नाथ रथाप्रमाणेच कार्यकर्ते रथ ओढणार आहेत.

– शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाचा श्री जगन्नाथचा ठेका

– अग्रभागी लोणकर बंधूंचे नगारा वादन

– स्व-रूपवर्धनी, गजलक्ष्मी वाद्यपथके

– स्वरूपवर्धिनीची मल्लखांबची प्रात्यक्षिक

केसरीवाडा गणेशोत्सव

– परंपरेप्रमाणे फुलांनी सजविलेल्या पालखीतून गणरायांची मिरवणूक

– इतिहासाचे अभ्यासक मोहन शेटे हे लोकमान्यांच्या वेशभूषेत

– बिडवे बंधूंचा सनई-चौघडाचा गाडा

– श्रीराम, शिवमुद्रा, आवर्तन ढोल-ताशा पथकाचे वादन.

– विठ्ठलाची भव्य मूर्ती असलेला माऊली रथ

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट

– फुलांची सजावट केलेल्या रथातून रात्री आठ वाजता मिरवणुकीस सुरुवात

– श्रीराम पथक, समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा पथकांचे वादन

– शिवयोद्धा पथकाचे मर्दानी खेळ

– पारंपरिक लोककला प्रकारांचे सादरीकरण

अखिल मंडई मंडळ

– सायंकाळी ७ वाजता विद्युत रोषणाईने सजविण्यात आलेल्या ‘आदिशक्ती’ रथात विराजमान शारदा गजाननाच्या मूर्ती

– रथात रौद्र रूपातील कालीमातेची १५ फूट उंचीची मूर्ती

– यंदा प्रथमच मूर्ती साठ अंशात फिरणार असल्याने भाविकांना दोन्ही बाजूंनी दर्शन घेण्याची संधी

– जयंत नगरकर यांचे नगारावादन

– गंधर्व बँडपथक

– शिवगर्जना, शिवमुद्रा वाद्य पथकाचा सहभाग

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

– आकर्षक विद्युतरोषणाईने उजळून निघालेल्या श्री उमांगमलज रथातून गणरायाची मिरवणूक

– युवा कलादिग्दर्शक विराज खटावकर यांनी साकारलेला रथ

– मिरवणुकीत रुग्णसेवा रथ अग्रभागी, सनई-चौघडा

– प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड,

– स्व-रूपवर्धिनीचे ढोल-ताशा पथक