गणेशोत्सवात मध्यभागातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. गर्दी वाढल्यास लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्त्यासह उपरस्ते वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Ganesh Utsav 2022 Live : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी महाराष्ट्र सज्ज; जाणून घ्या गणेशोत्सवाचे लाईव्ह अपडेटस्

उत्सवाच्या कालावधीत मध्यभागात भाविकांची मोठी गर्दी होते. गर्दीच्या नियोजन करण्यासाठी गरज भासल्यास दुपारी तीननंतर प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. गर्दी ओसरेपर्यंत रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविले आहे.

वाहतुकीस बंद राहणारे रस्ते पुढीलप्रमाणे-

लक्ष्मी रस्ता (हमजेखान चौक ते टिळक चौक) , शिवाजी रस्ता (स. गो. बर्वे चौक ते जेधे चौक), बाजीराव रस्ता- पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक, टिळक रस्ता ( मराठा चेंबर ते हिराबाग चाैक), सिंहगड गॅरेज, घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक, दिनकर जवळकर पथ ते पायगुडे चौक (जोशी आळी), हिराबाग चौक, कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता वाहतुकीस बंद, सणस रस्ता (गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक), पानघंटी चौक ते गंज पेठ पोलीस चौकी, गायकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलीस चाैकी, कोहिनूर चौक ते बाबाजान चौक (लष्कर भाग), जेधे प्रासाद रस्ता ते शास्त्री रस्ता ते सोन्या मारुती चौक, गुरुनानक पथ ते हमजेखान चौक

दुतर्फा वाहने लावण्यास मनाई –

शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते गोटीराम भैय्या चौक, मंडई ते शनिपार चौक, बाजीराव रस्त्यावरील शनिपार चौक ते फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या मार्गांवर दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

वाहने लावण्याची ठिकाणे –

कर्वे रस्त्यावरील विमलाबाई गरवारे महाविद्यालय, शनिवार वाडा परिसरातील एच. व्ही देसाई महाविद्यालय, पुलाची वाडी नदीपात्रातील रस्ता, पूरम चौक ते हाॅटेल विश्व चौक (रस्त्याच्या डाव्या बाजूला), सोमवार पेठेतील दारुवाला पूल ते खडीचे मैदान ,गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस चौक, व्होल्गा चौक ते मित्र मंडळ चौक (कालव्यालगत, वीर पासलकर पथ), टिळक पूल ते भिडे पूल नदीपात्रातील रस्ता, बालभवनसमोर (सारसबाग ते बजाज पुतळा, सणस पुतळा चौक उजवी बाजू), शिवाजीराव आढाव वाहनतळ (नारायण पेठ, हमाल वाडा)

वाहनचालकांच्या माहितीसाठी –

गणेश विसर्जनापर्यंत शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता,अलका टॉकीज चौक, टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याने इच्छितस्थळी जावे. लक्ष्मी रस्त्यावरुन जाणाऱ्या चारचाकी वाहनांना बेलबाग चौकातून डावीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh utsav 2022 pune change in traffic if crowd increases lakshmi road shivaji road traffic via alternate route pune print news msr