मागणीच्या तुलनेत आवक अपुरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवासाठी फुलांना मागणी वाढली असून सर्व प्रकारच्या फुलांच्या दरात तिपटीने वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत फुलांची आवक अपुरी पडत आहे.

गेल्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्य़ात पावसाच्या सरी कोसळत असल्याने झेंडू तसेच शेवंतीची फुले भिजली आहेत. मात्र, झेंडूसह सर्वच फुलांची आवक श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात सुरू असून रविवारी फूल बाजारात किरकोळ खरेदीदार तसेच व्यापाऱ्यांची गर्दी झाली होती. झेंडू, गुलछडी, शेवंती, अस्टर तसेच डच गुलाबांना मागणी वाढली आहे. चांगल्या प्रतीच्या फुलांना मागणी वाढली आहे. कोलकाता झेंडूला प्रतिकिलो ७० ते १०० रुपये असा दर मिळाला. साध्या झेंडूला ४० ते ७० रुपये तसेच शेवंतीला १०० ते २०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी विविध सार्वजनिक मंडळांकडून फुलांच्या सजावटीचे रथ तयार करण्यात येतात. फुलांची सजावट करणारे कलाकार तसेच हार विक्रेत्यांकडून फुलांना मोठी मागणी आहे.

घाऊक बाजारात फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे- झेंडू- ४० ते १०० रुपये, गुलछडी- २५० ते ४०० रुपये, बिजली- १५० ते २५० रुपये, कापरी- ५० ते १०० रुपये, शेवंती- १०० ते २०० रुपये, अस्टर- ३० ते ५० रुपये, गलांडय़ा – १५ ते २५ रुपये (गड्डीचे भाव), गुलाबगड्डी- ३० ते ७०

रुपये, गुलछडी काडी- २० ते ६० रुपये, डच गुलाब (२० नग)- ६० ते १२० रुपये, लिलि बंडल- ४० ते ५० रुपये, जर्बेरा-८० ते १०० रुपये, कार्नेशियन- १४० ते २५० रुपये.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१९ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh utsav flowers market akp 94
Show comments