पुणे : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेल्या लाखो पुणेकरांच्या उपस्थितीत मानाचे पाच गणपतींचे ढोल-ताश्यांच्या गजरात विसर्जन करण्यात आले.सकाळी १०: १५ वाजता पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते पुजा करून मिरवणुकीला सुरूवात झाली. दरम्यान चार वाजण्याच्या सुमारास वरूणराजाने हजेरी लावली.गणरायांच्या भक्तीत लीन होत आणि जोरदार पावसात पुणेकर नागरिकांनी गणरायांला निरोप दिला. गतवर्षी प्रमाणे यंदाही सायंकाळी सातच्या आत मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

* मानाचा पहिला कसबा गणपती १०:१५ वाजता मिरवणूक सुरू तर ४:३५ वाजता विसर्जन झाले.

* मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती ११ वाजता मिरवणूक सुरू ५ :१० वाजाता विसर्जन झाले

* मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती १२ वाजता मिरवणुक सुरू आणि ५: ५५  वाजता विसर्जन झाले.

* मानाचा चौथा तुळशीबाग गणपती १ वाजता मिरवणूक सुरू तर ६:32 वाजता विसर्जन झाले. * मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती २:१५ मिरवणूक सुरू तर ६:४५  वा  विसर्जन झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh visarjan 2023 five manache ganpati immersed in pune svk 88 zws