पुणे : हवामान विभागाने शनिवारसाठी पुणे जिल्ह्याला नारंगी इशारा दिला आहे. शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शनिवारी (७ सप्टेंबर) गणरायाच्या आगमनाला पावसाच्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. रायगड, सातारा आणि पुणे जिल्ह्यांना नारंगी इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यासह सातारा आणि पुण्याच्या घाट परिसरात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. शहरात दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. त्यामुळे गणरायाच्या आगमनाला वरुणराजा हजेरी लावण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – पिंपरी : गणेशोत्सवासाठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त; ध्वनी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या सूचना

राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने तीन – चार दिवस अल्प विश्रांती घेतली. आता पुन्हा पाऊस सक्रीय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने शनिवार, रविवार आणि सोमवारी किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्राला नारंगी इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील चार दिवस विदर्भातही हलक्या पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा – कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या निर्णयावर टीकेची झोड, निर्णय रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा

नारंगी इशारा

शनिवार – रायगड, पुणे, सातारा
रविवार – सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे
सोमवार – रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesha arrival in rain showers know today rain forecast across maharashtra pune print news dbj 20 ssb