गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांपुढे यंदाही प्रवासविघ्न उभे ठाकले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मिळून सुमारे ८० किलोमीटर रस्त्यावर एक मार्गिकाही पूर्ण झालेली नसून, खड्डे कायम असल्याने कोकणात निघालेल्या गणेशभक्तांना कसरत करावी लागत आहे. असं असलं तरी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारने टोलमाफी घोषित केली आहे. पण टोलमाफी सरसकट दिली जाणार नाही. यासाठी सरकारने अट घातली आहे.

१६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तासांठी पथकर माफी (टोलमाफी) लागू करण्याबाबतचा शासननिर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. मात्र, यामध्ये एक अट घातली आहे. मुंबई-बंगळूरु आणि मुंबई-गोवा या दोन राष्ट्रीय महामार्गांनी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ‘गणेशोत्सव २०२३ कोकण दर्शन’ अशा आशयाची प्रवेशिका वाहनावर चिटकावी लागणार आहे, ही प्रवेशिका चिटकावल्यानंतरच वाहनांना टोलमाफी मिळणार आहे.

हेही वाचा- “…तर खासगी कंपन्यांना १५०० कोटी द्यावे लागतील”, कंत्राटी नोकरभरतीवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक कार्यालायांमध्ये पथकर माफीचे (टोल) पास मिळणार आहेत. त्यासाठी वाहन चालक परवाना, नोंदणी पुस्तक, छायांकित प्रत संबंधित अधिकाऱ्यांकडे द्यावी लागणार आहे. जे गणेशभक्त मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरून कोकणात जाणार आहेत. त्यांना या पासचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी सर्व विभागीय वाहतूक कार्यालयामध्ये सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत तसेच नियंत्रण कक्षात चोवीस तास पासेस मिळणार आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांना ९५२९६८१०७८ या वाहतूक शाखेच्या मुख्य नियंत्रण कक्षाला संपर्क साधून मदत घेता येणार आहे.

हेही वाचा- Ganesh Ustav 2023: ‘आरे’तील तलावांत यंदाही विसर्जन अशक्य? परवानगी मागणाऱ्या विहिंपच्या याचिकेवर तातडीने सुनावणीस नकार

पिंपरी चिंचवड परिसरात ‘येथे’ मिळणार पास

चिंचवडगावातील वाहतूक नियंत्रण कक्ष, सांगवी, हिंजवडी, निगडी, पिंपरी, भोसरी, चिंचवड, चाकण, दिघी आळंदी, देहूरोड, तळवडे, वाकड, महाळुंगे, तळेगावदाभाडे, बावधन येथील वाहतूक कार्यालयात पास मिळणार आहेत.

Story img Loader