पिंपरी : शहरात प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत गणेश मूर्ती संकलन केंद्र सुरू करण्याची सूचना महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासनाला केली. गणेश मूर्ती संकलन करणारी वाहने सुस्थितीत असावीत. पर्यावरपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सामाजिक संस्थांनी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सव १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, क्षेत्रीय कार्यालयनिहाय आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी महापालिका भवनात बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, स्वयंसेवी संघटना, संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : पुणे मेट्रो निगडीपर्यंत सुसाट! स्वारगेट ते कात्रज मेट्रोला मात्र ब्रेक

शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीचे मार्ग तसेच, सर्व विसर्जन घाट व्यवस्थित करावेत. विसर्जनाच्या ठिकाणी पुरेशा विद्युत प्रकाशाची व्यवस्था करावी. नदी घाटावर असणाऱ्या कृत्रिम विसर्जन हौदांची डागडुजी करावी. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सार्वजनिक गणेश मंडळ, हाऊसिंग सोसायट्या, अशासकीय संस्था, पर्यावरणवादी संघटना यांच्याशी समन्वय साधून गणेशोत्सव आनंदी वातावरणात पार पाडावा यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी क्षेत्रीय अधिकारी यांना दिल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesha murti collection center under pimpri regional office pune print news ggy 03 css
Show comments