पिंपरी: दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. यावर्षी सोनालीने गणपती बाप्पाच्या माध्यमातून संत तुकोबांचे रूप साकारले आहे. गेल्या वर्षी काही कारणामुळे सोनाली गणपती उत्सव साजरा करू शकली नव्हती. त्यामुळे यावर्षी ती मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा-पुणे शहरातील वाहतुकीत आजपासून बदल, सायंकाळी पाचनंतर मध्यभागातील रस्ते होणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झाले आहे. सोनाली आणि तिचा भाऊ अतुल हा दरवर्षी इको फ्रेंडली गणपती साकारतात. गणपती बाप्पाच्या माध्यमातून तिने तुकोबांचे रूप साकारले आहे. यावर्षी महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये वरून राजाने कृपादृष्टी दाखवली नाही. अनेक भागात दुष्काळाचे सावट आहे. महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडावा आणि बळीराजा सुखी व्हावा असं साकडं सोनालीने गणपती बाप्पा चरणी घातलं आहे. गेल्या वर्षी सोनालीच्या आजीचं निधन झालं होतं त्यामुळे तिने गणपती उत्सव साजरा केला नव्हता. यावर्षी गणेशोत्सव साजरा करत तिने गणपती बाप्पाची इको फ्रेंडली मूर्ती आजीला समर्पित केली आहे.