पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळचे यंदाचे १३१ वे वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामधून मिरवणुकीला सुरुवात झाली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते सकाळी १० वाजून ३० वाजता प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून हनुमान रथातून श्रीं च्या आगमन मिरवणुकीला श्री हनुमानाच्या ४ मूर्ती असलेल्या फुलांच्या रथातून सुरवात झाली आहे. या मिरवणुकीचे दृश्य टिपण्यासाठी हजारो पुणेकर भाविकांचे मोबाईल सरसावाल्याचे पाहण्यास मिळाले.

आणखी वाचा-पुणे: गणेशभक्तांनी खुशखबर! गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोच्या वेळेत वाढ; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

ही मिरवणुक मुख्य मंदिरपासून अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपाकडे मार्गस्थ झाली आहे. देवळणकर बंधूचा चौघडा,गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल ताशा पथक मिरवणुकीत सहभागी झाली आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshotsav 2023 srimant dagadusheth ganpati procession is begins svk 88 mrj