श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे पुणेकरांचे अढळ श्रद्धास्थान आहे. मनोकामना पूर्ण करणाऱ्या गणपतींमध्ये या गणपतीचं नाव अग्रकमाने घेतलं जातं. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश-विदेशातून भाविक येत असतात. पुण्यातील मानाच्या गणपतींइतकंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचंही महत्त्व आहे. लोकसत्ताच्या ‘तू सुखकर्ता’ या विशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं महत्त्व तसंच त्याचा इतिहास…

पुण्यातील मानाचे तसंच इतर गणपतींचे महत्त्व आणि वैशिष्ट्य आपण अशाच व्हिडीओंच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Story img Loader