पुण्याचं ग्रामदैवत म्हणजे कसबा गणपती. या गणपतीला १४०० वर्षांचा इतिहास आहे. ही मूर्ती तांदळा स्वरुपात आहे. तांदळा स्वरुप म्हणजे या मूर्तीला घडवण्यात येत नाही. आठवड्यातून दोनवेळा या मूर्तीला शेंदूर लेपन केलं आहे. या गणपतीच्या डोळ्यात हिरे आहेत. ही मूर्ती स्वयंभू स्वरुपातली आहे. या मूर्तीवर शेंदूर लेपन करण्यात येतं. पुण्यातला पहिला मानाचा गणपती असा बहुमान या गणपतीला लाभला आहे. लोकसत्ताच्या तू सुखकर्ता या विशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत याच गणपतीचं महत्त्व आणि त्याच्या इतिहासाची माहिती..
पहा व्हिडीओ –
पुणे जेव्हा बेचिराख झालं होतं त्यानंतर शिवाजी महाराज आणि जिजाऊ या ठिकाणी आल्या. इथे सोन्याचा नांगर फिरवला. त्यावेळी त्यांनी कसबा गणपतीची पुन्हा एकदा प्रतिष्ठापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ठकार घराण्याकडे या गणपतीची पूजा-अर्चना करण्याची जबाबदारी दिली होती. ते कायम छत्रपती शिवाजी महाराजांना विजयी भव असा आशीर्वाद देत त्यामुळे या गणपतीला जयती गणेश असंही नाव पडलं. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या गणपतीचा उत्सव साजरा होतो. या सगळ्या परंपरेमुळे आणि इतिहासामुळे या गणपतीला पुण्यातल्या मानाच्या पहिल्या गणपतींपैकी पहिलं स्थान आहे. पुण्यातील मानाचे तसंच इतर गणपतींचे महत्त्व आणि वैशिष्ट्य आपण अशाच व्हिडीओंच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.