गणेशोत्सव म्हटल्यावर ९० च्या दशकामध्ये जन्मलेल्या मुलांना आजही आठवतात ते म्हणजे मंडपातील हलते देखावे. सध्या अगदीच मोजक्या ठिकाणी हे असे हलते देखावे पहायला मिळतात. मात्र या हलत्या देखाव्यांची सुरुवात कोणत्या मंडळापासून झाली आहे तुम्हाला ठाऊक आहे का? या देखाव्यांची सुरुवात झाली पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक असणाऱ्या श्री तुळीशाबाग गणपती मंडळांपासून. लोकसत्ताच्या ‘तू सुखकर्ता’ या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात आपण श्री तुळशीबाग गणपतीचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत.
तुळशीबाग गणपती हा पुण्यातील मानाचा चौथा गपणती आहे. १२० वर्षांची परंपरा असणाऱ्या या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली. श्री तुळशीबाग गणपती जिथे विराजमान होतो तिथे पेशवेकालीन मंदिर आहे. गणपती मंडपामध्ये हलता देखावा साकारणे देशातील पहिले मंडळ म्हणून ओळख असणाऱ्या या मंडळाचा प्रवास हलत्या देखाव्यांइतकाच रंजक आहे.
पुण्यातील मानाचे तसंच इतर गणपतींचे महत्त्व आणि वैशिष्ट्य आपण अशाच व्हिडीओंच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.