लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ‘तुमच्याकडे लावलेले वीजमीटर संथ झाले आहे. कनेक्शन दिल्यापासून तुम्हाला लाखो रुपयांचे बिल भरावे लागेल. तुमचे वीजमीटर बदलून देतो. त्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल’ अशी बतावणी करून, तसेच महावितरणचे कर्मचारी असल्याचे भासवून महावितरण आणि वीजग्राहकांचे लाखो रुपयांचे नुकसान करणारी टोळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

pune Penal action against two senior officers for facilitating bogus payments at Jijamata Hospital
पिंपरी : मानधनाची २१ लाखांची बोगस बिले लाटली; दाेन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पाचशे रुपये…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
more than 1700 retirees people in nashik benefit from DLC scheme of Postal Department
सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ
Dombivli tax arrears people, Dombivli property seal,
डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
15 crores governor post marathi news
१५ कोटी द्या, राज्यपाल करतो…तामिळनाडूतील एकाची कोट्यवधी रुपयांना फसवणूक
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड

चाकण परिसरात काही ठिकाणी अज्ञात व्यक्ती महावितरणचे कर्मचारी असल्याची बतावणी करून वीजग्राहकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याची कुणकुण महावितरणला लागली होती. यामध्ये हे तोतया कर्मचारी वीजग्राहकांशी थेट संपर्क साधून ‘तुमचे मीटर संथ असल्याने मोठ्या रकमेचे बिल येणार आहे. ते न भरल्यास वीजपुरवठा खंडित होणार आहे’ अशी भीती दाखवत आर्थिक लुबाडणूक करणे, जुने महावितरणचे मीटर काढून गहाळ करणे आणि त्या ठिकाणी बाजारातून खरेदी केलेले मीटर ग्राहकांकडे लावत असल्याचे प्रकार होत असल्याची माहिती मिळाली. या प्रकारच्या माहितीची मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी गंभीर दखल घेतली.

आणखी वाचा-पुणे : काम करण्यास सांगितल्याने मुलाकडून वडिलांचा खून; आई जखमी

पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता युवराज जरग, राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके, चाकणचे उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे, सहायक अभियंता अविनाश सावंत यांनी कर्मचाऱ्यांसह संशयास्पद वीजमीटरची तपासणी सुरु केली. यामध्ये चाकण येथील नाणेकरवाडी, आंबेठाण रस्ता, माणिक चौक परिसरात काही ग्राहकांकडे वीजमीटर बदलले आहे, परंतु त्याची महावितरणकडे नोंद नाही किंवा जुने मीटर महावितरणकडे जमा केले नसल्याचे आढळून आले.

याबाबत संबंधित वीजग्राहकांना विश्वासात घेत अधिक तपास केला असता परस्पर वीजमीटर बदलून देणारा आरोपी दयानंद पट्टेकर हा मीटर रीडिंग घेणाऱ्या अलमदाद कम्प्युटर एजन्सीशी संबंधित असल्याचे उघड झाले. आरोपी पट्टेकर व अज्ञात तीन व्यक्तींनी महावितरणचे भरारी पथकाचे कर्मचारी असल्याचे भासवून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गेल्या ऑगस्ट महिन्यात तीन वीजग्राहकांकडील वीजमीटर परस्पर बदलून दिले. यामध्ये महावितरणचे सुमारे एक लाख २२ हजार २७७ युनिटचे म्हणजे १३ लाख २८ हजार २७० रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी महावितरणकडून चाकण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३६ व १३८ नुसार दयानंद पट्टेकर आणि तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-राज्यावर दुष्काळाचे सावट… ‘या’ जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती

वीजमीटरमधील वापर कमी दाखवणे, संथगतीसाठी मीटरमध्ये फेरफार किंवा वीजबिलाची रक्कम कमी करून देणे आदी आमिष दाखविणे तसेच महावितरणचा कर्मचारी असल्याचे भासवून किंवा अन्य खाजगी व्यक्तीने वीजग्राहकांकडे रकमेची मागणी केल्यास त्यास कोणताही प्रतिसाद देऊ नये. याबाबत महावितरणच्या संबंधित कार्यालयामध्ये कळवावे किंवा तक्रार करावी. -राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, महावितरण

Story img Loader