पिंपरी : आयटी कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत बनावट नियुक्तीपत्र देवून ७० मुला-मुलींची ५० लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली. महेशकुमार हरिचंद्र कोळी ( वय ३२, रा.  सोमवार पेठ, पुणे), अनुदिप चंद्रकांत पशुपती ऊर्फ शर्मा ( वय ५२, रा. कानदेवनगर, वाघोली),  कल्पना मारुतराव बखाल ( वय ३० रा. दत्तनगर, दिघी) आणि श्रावण एकनाथ शिंदे ( वय ३२, रा.तुकारामनगर वाघोली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील दुहेरी वाहतुकीचे आदेश रद्द

याबाबत कमलेश पंढरीनाथ गंगावणे (वय  ४०, रा.काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. टेक्नॉलॉजी एस ए पी, एम एम कंपनी आणि एम के मॅनेजमेंट सर्व्हिसेस नावाने नोकरीची जाहिरात देणारा कंपनीचा मालक कोळी आणि आरोपींनी फिर्यादी गंगावणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आरोपी पशुपती याच्या खराडीतील आयटी कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. अस्तित्वात नसलेल्या कंपनीचे नेमणूक पत्र दिले. फिर्यादीसह ६० ते ७० मुला-मुलींकडून गुगल, फोनपेद्वारे ५० लाख रुपये उकळले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang arrested for cheated people by giving fake job appointment letter in it company pune print news ggy 03 zws