पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. वेगवेगळ्या केलेल्या कारवाईत एकूण एक कोटी ३१ लाखांचा ९६ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपी हे रुग्णवाहिकेतून गांजा विक्री करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. कृष्णा मारुती शिंदे, अक्षय बारकू मोरे, हनुमंत भाऊसाहेब कदम, देवी प्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे, सन्नीदेवल सिध्दार्थ शर्मा, सन्नीदेवल भगवानदास भारती आणि सौरभ निर्मल यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कृष्णा मारुती शिंदे, अक्षय बारकू मोरे आणि हनुमंत भाऊसाहेब कदम यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर ३० लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात २५ लाख ३९ हजार किमतीचा २५ किलो गांजा, चारचाकी आणि चार मोबाईलचा समावेश आहे. आरोपींनी गांजा देवी प्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे यांच्याकडून आणला होता. तो सौरभ निर्मल यास विकणार असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यांच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Yenpure gang , Katraj , Leader Yenpure gang arrested
पुणे : कात्रज भागातील येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक, मोक्का कारवाईनंतर दोन वर्ष पसार
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल
bike thieves arrested loksatta news
कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीत मोटार सायकल चोरणारे उल्हासनगरमधून अटक
A bull carrying sugarcane sat on the road
त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO
fir against against five for selling nylon manja
नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हे
Video : येरवड्यात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांची धिंड, पाेलिसांकडून भरचौकात साथीदारांना चोप

आणखी वाचा-…आणि नौदलप्रमुखांनी मारल्या पुशअप्स! व्हिडिओ होतोय व्हायरल

दरम्यान, आरोपी देवी प्रसादलाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ५० लाख २० हजारांचा ५० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे रुग्णवाहिकेतून गांजाची विक्री आणि डिलिव्हरी करत असल्याच तपासात समोर आले आहे. तसेच सन्नीदेवल सिध्दार्थ शर्मा आणि सन्नीदेवल भगवानदास भारती यांच्याकडून २० लाख ७९ हजारांचा २० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. असा एकूण १ कोटी ३१ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हा गांजा रूपीनगर चिखलीत विकणार असल्याचं समोर आलं आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक वैभव शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Story img Loader