पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी करणाऱ्या चोरट्यासह साथीदारांना लष्कर पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून दहा मोबाइल संच जप्त करण्यात आले. चोरट्यांनी लष्कर भागातील एका दुकानाचे कुलूप तोडून मोबाइल संच चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शाहरूख सलाउद्यीन खतीब (वय २४, रा. भाग्योदय नगर, कोंढवा), सलिम हसन शेख (वय २४), सर्फराज पाशा शेख (वय २२), अजीम बबलू शेख (वय २०, तिघे रा. कासेवाडी, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ३ डिसेंब रोजी लष्कर भागातील एका मोबाइल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा मोबाइल संच चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. चित्रीकरण, तसेच खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खतीब आणि साथीदारांनी मोबाइल दुकानात चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसंच्या पथकाने सापळा लावून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून दहा मोबाइल संच जप्त करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिशकुमार दिघावकर, पोलीस निरिक्षक प्रदिप पवार, उपनिरिक्षक राहुल घाडगे, महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिर्डे, रमेश चौधर, सचिन मांजरे, लोकेश कदम, हराळ, कोडिलकर, अलका ब्राम्हणे यांनी ही कारवाई केली.