वैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण करून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना मुंढव्यातील केशवनगर भागात घडली.या प्रकरणी राहुल उर्फ लल्ला कांबळे आणि स्वप्निल उर्फ नन्या मिसाळ यांच्यासह साथीदारांच्या विराेधात मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनुप ढगे (२४, रा.म्हसोबा वस्ती, केशवनगर ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>पुणे: जादूटोणाबाबत घटना आढळल्यास पोलीस ठाण्यात तक्रार द्या; समाज कल्याण विभागाचे आवाहन

अनुप आणि त्यांचा मित्र केशवनगर भागातून निघाले होते त्या वेळी आरोपी कांबळे आणि मिसाळ यांनी अनुपला अडवले. तू नन्या मिसाळ याला विरोध करतो का, अशी अशी विचारणा केली. अनुपला गजाने बेदम मारहाण केली. त्या वेळी अनुपच्या मित्राने मध्यस्थी केली. तेव्हा टोळक्याने त्याला मारहाण केली.टोळक्याच्या दहशतीमुळे परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद केली. सहायक पोलीस निरीक्षक पोटे तपास करीत आहेत.