पुणे : पूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या रागातून टोळक्याने तरूणाला बेदम मारहाण करीत त्याच्यावर वार करून गंभीररित्या जखमी केले. त्याच्या आईवरही वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी वार चुकविल्यामुळे दुखापत झाली नाही. त्यांना लोखंडी सळईने मारहाण केली. मार्केट यार्ड परिसरातील भिमाले कॉम्प्लेक्ससमोर १४ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी १५ जणांविरूद्ध मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनी उर्फ योगेश पारडे (वय ३५), तेजस गजरमल (वय २५). गणेश भुम्बे (वय २७), साहिल गजरमल (वय २२), सुभाष नाईकिंदे (वय ४०), प्रवीण उर्फ अशोक पाटोळे (वय ३५), सागर पारडे (वय ४०), सूरज पारडे (वय २९), रामा गजरमल (वय ४५), चंदर गायकवाड (वय ५०), रोहित चंदर गायकवाड (वय २७), अनिता गरजमल (वय ३७), भारती गरजमल (वय ३६), चतुरा पारडे (वय ४५) आणि सपना पारडे (वय २७) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जयश्री युवराज वाघमारे (वय ४३ रा. संदेशनगर मार्केट यार्ड) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वाघमारे आणि आरोपी एकाच परिसरात राहायला असून, काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे तक्रारदाराच्या मुलाने संबंधिताविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याचा राग टोळक्याच्या मनात होता. त्याच रागातून १४ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा भिमाले कॉम्प्लेक्ससमोर असताना त्याला गाठले. त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर टोळक्याने जयश्रीला लाेखंडी सळईने मारहाण करून जखमी केले. त्यांच्या मुलाला गायब करण्याची धमकी टोळक्याने दिली. याप्रकरणी उपनिरीक्षक सुवर्णा पवार तपास करीत आहेत.