पिंपरी : रिक्षाची वाट बघत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर थांबल्याच्या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने एका तृतीयपंथीयाला डोक्यावर बीअरची बाटली मारून आणि चाकूने वार करून जखमी केले. तसेच त्याच्या तीन मैत्रिणींनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. दिघीतील आळंदी रोड परिसरात रविवारी (दि. २९) ही घटना घडली.

हेही वाचा >>> रेल्वे सुरक्षा दलातील हवालदाराकडून छत्तीसगडमधून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; हवालदाराचा साथीदार अटकेत

Talbid police have arrested the fugitive gangsters from Ahmedabad and left for Ahmedabad.
अहमदाबादमधून फरारी सराईत पाच गुंडांना कराडजवळ अटक, तळबीड पोलिसांची कारवाई
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?

अक्षय ऊर्फ जोया हजेरी (वय २३, रा. येरवडा) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोन्या माने व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अक्षय व त्यांच्या मैत्रिणी हे रिक्षाची वाट बघत थांबले होते. या वेळी मोन्या माने व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी महाविद्यालय प्रवेशद्वारासमोर रिक्षाची वाट पाहत असल्याच्या कारणावरून चिडून हातातील बीअरच्या बाटलीने अक्षयच्या डोक्यात मारून, तसेच चाकूने कमरेवर वार करत जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मैत्रिणींनादेखील आरोपी मोन्याने लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.

Story img Loader