पुणे : कौटुंबिक वादातून दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत टोळक्याने तरुणाचा खून केल्याची घटना वानवडी येथील सय्यदनगरमध्ये गुरुवारी रात्री घडली. गर्दीच्या वेळी भररस्त्यात झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. हल्लेखोरांनी काही तरुणांच्या हाताची बोटे छाटल्याचाही प्रकार घडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजीम शेख उर्फ अंत्या (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सय्यदनगरमध्ये गुरुवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाली. टोळक्याने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला, तर काही तरुण जखमी झाले. काही तरुणांच्या हाताची बोटे छाटण्यात आली. त्यानंतर हे टोळके पसार झाले. भर रस्त्यातील हा प्रकार पाहून घाबरून नागरिक सैरावैरा पळत होते. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. वानवडी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang killing of youth cut off the fingers of some youths pune print news rbk 25 ysh