लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: वडारवाडी भागातील पांडवनगर महापालिका वसाहतीत गुंडांच्या टोळीने दहशत माजवून वीस वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

या प्रकरणी रुपेश विटकर, चपत्या विटकर, लवकुश चव्हाण, सुरज जाधव, अक्षय जाधव, इशान पठाण, इस्माईल शेख, बबलू देवकुळे, चैतन्य पवार, चिम्या यांच्यासह १८ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपेश विटकर सराइत गुन्हेगार आहे.

हेही वाचा…. काही झाले की माझ्या भावावर खापर फोडले जाते: सुप्रिया सुळे

रुपेश आणि त्याचे साथीदारांनी पांडवनगरमधील महापालिका वसाहतीत शिरले. तेथे लावलेल्या दुचाकी आणि मोटारींची तोडफोड केली. वसाहतीतील रहिवाशांनी गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गुंडांनी रहिवाशांना शिवीगाळ करुन मारहाण केली. या घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली.

हेही वाचा…. “आर.टी.ई शुल्कावरून पालक-शाळांमध्ये वाद”, समाजवादी शिक्षण हक्क सभेची सरकारकडे प्रतिपुर्तीची मागणी

पांडवनगर, वडारवाडी भागात गेल्या तीन वर्षांपासून वर्चस्वाच्या वादातून दोन टोळ्यांमध्ये हाणामारी होण्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी गुंड टोळीच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang of gangsters created terror and vandalized twenty vehicles in pandavanagar municipal colony pune pune print news rbj 25 dvr
Show comments