सिंहगड रस्ता परिसरात पादचाऱ्यांना धमकावून मोबाइल संच हिसकावणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली.रवीशकुमार प्रमोद सहानी (वय २२, रा. कुंबरे पार्क, वाघोली), मुकेश हरीचंद्र सहानी (वय २४, रा. आंबेगाव खुर्द), मनीषकुमार मनोज सहानी (वय २३, रा. भूमकर चौकाजवळ, नऱ्हे) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत विजय आटपाडकर (वय २५, रा. आंबेगाव खुर्द) याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आटपाडकर मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन मध्यरात्री निघाला होता. त्या वेळी भूमकर चौकाजवळ आटपाडकरला अडवले. त्याला धमकावून चोरट्यांनी मोबाइल संच हिसकावून नेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा: प्रेमप्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन युवकाचे अपहरण, मारहाणीत युवक गंभीर जखमी; दोघे अटकेत

चोरट्यांनी आणखी एकाचा मोबाइल संच हिसकावून नेला. या घटनेची माहिती आटपाडकर यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तपास करुन आरोपी सहानी यांना पकडले. आराेपी सहानी यांनी आणखी काही जणांचे मोबाइल संच हिसकावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस कर्मचारी गोरक्षनाथ काळे तपास करत आहेत.