पुणे : भवानी पेठेतील एका व्यापाऱ्याकडील रोकड लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केले. आमान समीर शेख (वय २२), अमीर समीर शेख (वय २०), अमोल अनिल अंबवणे (वय २०), शाहरुख दाऊद सय्यद (वय २६), सादिक अमीर शेख (वय २५, सर्व रा. कासेवाडी, भवानी पेठ) असी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. भवानी पेठेतील एक व्यापारी दररोज रात्री दुकानात जमा झालेली रोकड घेऊन घरी जात असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. आरोपींनी त्याच्यावर पाळत ठेवली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : पुणे : अतिवृष्टी बाधितांसाठी तीन कोटी १८ लाखांचा निधी प्राप्त

नवरात्रोत्सवानिमित्त गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाकडून श्री भवानी माता मंदिर परिसरात गस्त घालण्यात येत होते. त्या वेळी आरोपी भवानी पेठेतील एका उद्यानाजवळ थांबले असून ते व्यापाऱ्याकडील रोकड लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून पाच आरोपींना पकडले. त्याच्याकडून दोन कोयते, मिरची पूड, दांडके असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, अजय जाधव, अमोल पवार, इम्रान शेख, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, महेश बामगुडे