पुणे : बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याच्या धाकाने सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती तपासात मिळाली आहे. पीडित तरुणी आणि तिच्या मित्राला आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. बलात्कारापूर्वी आरोपींनी तरुणी आणि तिच्या मित्राकडील चीजवस्तूंची लूट केल्याचे तपाासात उघडकीस आले आहे.
कोंढव्यातील टेबल पाॅईंट परिसरात गुरुवारी रात्री तरुणी आणि तिचा मित्र फिरायला गेले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखविला. मित्राला मारहाण करुन त्याचा शर्ट काढला. शर्टनने हातपाय बांधले. पॅन्टचा पट्टा काढून त्याचे पाय बांधले. तरुणाला एका झाडाला बांधून आरोपींनी तरुणीवर सामुहिक बलात्कार केला. आरोपींकडे कोयता, चाकू अशी शस्त्रे होती, तसेच एका आरोपीच्या हातात बांबू होता, अशी माहिती तपासात मिळाली आहे. मित्राला ठार मारण्याची धमकी देऊन आरोपींनी तरुणीवर सामुहिक बलात्कार केला.
हेही वाचा >>>महिला अत्याचाराच्या विरोधात सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज- डाॅ. नीलम गोऱ्हे यांची सूचना
आरोपी तेथून निघून गेल्यानंतर तरुणीने स्वत:ला सावरले. तिने झाडाला बांधलेल्या मित्राची सुटका केली. तेथून दोघे जण वारजे भागात गेले. पीडित तरुणीने तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती बहिणीला दिली. त्यानंतर तरुणी आणि तिचा मित्र एरंडवणे भागातील एका खासगी रुग्णलायात गेले. प्राथमिक उपचारानंतर तरुणीला ससून रुग्णलयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी पहाटे पोलिसांना रुग्णालय प्रशासनाने याबाबतची माहिती (एमएलसी- मेडिको लिगल केस) पोलिसांना कळविली.
हेही वाचा >>>शर्ट नीट न खोचल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण; स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा
आरोपींच्या मागावर २५ पथके
संशयित आरोपी सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले आहे. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार आरोपींचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. आरोपींविषयी काही माहिती असल्यास त्वरीत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आरोपींना पकडण्यासाटी पोलिसांनी २५ पथके तयार केली आहेत. ग्रामीण पोलिसांकडून पोलिसांना तपासात सहाय केले जात आहे. बोपदेव घाट निर्जन आहे. या भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तसेच तांत्रिक अडचणींमुळे मोबाइल विश्लेषण करण्यात येत अडथळे आले आहे. आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेले आहेत. सासवडकडे जात असताना संशयित आरोपींचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना उपलब्ध झाले आहे.